पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा. मराठी विभागा मार्फत ' मराठी भाषा गौरव दिन' शुक्रवार दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी साजरा केला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागत सत्काराने आणि सरस्वती मातेच्या, कुसुमाग्रजांच्या व अण्णासाहेब यांच्या प्रतिमेला वंदन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान
महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.एम के पाटील सरांनी भूषविले; त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मराठी भाषा आणि AI यांच्यात समन्वय कसा साधता येईल याविषयी मार्गदर्शन केले व महाविद्यालयात भाषा विषयी विविध कार्यक्रम आयोजित केले जातील, असे आश्वासन दिले.
प्रमुख वक्ते म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.मनोज चौधरी यांनी मराठी भाषेचे जतन व संवर्धन काळाची गरज याविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली संत ज्ञानेश्वरांपासून शिवाजी महाराजांपर्यंत मराठी भाषेचा इतिहास रेखाटला तसेच शहादा परिसराचे भाग्यविधाता कै. अण्णा साहेबांच्या शैक्षणिक कार्याची महती सांगितली.
उपप्राचार्य. सिंदखेडकर सरांनी वि.वा.शिरवाडकर यांच्या जीवना विषयी मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.तुषार पटेल सरांनी केले , सूत्रसंचालन आणि आभार प्रा.अश्विनी माळी यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी व प्राध्यापक वृंद उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. वजीह अशहर यांनी परिश्रम घेतले. तसेच संस्थेचे अध्यक्ष मा.दीपक भाई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, मानद सचिव कमलताई पाटील व संचालक मयुर पाटील यांचे मार्गदर्शन व शुभेच्छा लाभल्या.
