प्रतिनिधी शहादा
तालुक्यातील मामाचे मोहिदे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या वाढदिवसानिमित्त सचित्र बालमित्र पुस्तके वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन कोळी (संस्थापक अध्यक्ष टो.को. युवा मंच) व समाधान कोळी, उपस्थित होते.
मुख्याध्यापिका सौ.शालिनी रत्नपारखे यांनी युवा मंचने आत्तापर्यंत राबवलेले विविधांगी स्तुत्य उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश राठोड यांनी केले मालिनी सोनवणे , सारिका जाधव , सुरेंद्र जोशी , चांगदेव चव्हाण, बुध्या पटले, अशोक चव्हाण , रितेश कापुरे सर यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे समाजाचे कर्तव्य आहे. शिक्षणामुळेच मुलांचे भविष्य उज्वल होऊ शकते. या उपक्रमामुळे मुलांना शालेय जीवनात अधिक आत्मविश्वासाने सामोरे जाता येईल, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन सुदाम कोळी यांनी केले. 'माझी शाळा, माझी जबाबदारी' या नावाने संस्थेने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या वर्षी 'लेखन वाचन अभियान' अंतर्गत तब्बल ३००० विद्यार्थ्यांना ३००० सचित्र बालमित्र पुस्तक वाटप करण्याचे नियोजन असून या पुस्तक खरेदीसाठी आपल्यासारख्या देणगीदारांचे वेळोवेळी मिळणारे आर्थिक सहकार्य लाभले आहे.
कार्यक्रमाचा यशस्वितेसाठी मंचचे पदाधिकारी व सदस्य मनीष कोळी, सुनील कोळी,भैय्यासाहेब कोळी, सचिन कोळी, मनोज ईशी, विशाल ईशी, निलेश शिंदे, चेतन शिंदे,निलेश शिरसाठ, प्रदीप सोनवणे, मनोज कोळी,भरत सोनवणे, पंकज कोळी, पिंटू कोळी, दिनेश कोळी,यांनी सहकार्य केले.
