प्रतिनिधी शहादा
शहरातील राष्ट्र-गौरव श्री महाराणा प्रताप सिंह स्मारकाच्या ठिकाणी दिनांक २८ फेब्रुवारी रोजी गोकर्णेश्वर महादेव मंदिर सेवा समिती व हनुमान चालीसा पठण समितीतर्फे प्रथम स्मारकाची साफसफाई करण्यात आली.त्यानंतर समितीच्या सदस्यांनी अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात स्मारकाच्या ठिकाणी बसून हनुमान चालीसाचे पठाण केले.प्रथम सहभागी झालेल्या सर्व सदस्यांनी वीर-शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले।
याव्यतिरिक्त शहादा हनुमान चालीसा पठण समिती व गोकर्णेश्वर महादेव मंदिर समिती तर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी देखील समितीतर्फे सफाई करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले व सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याच्या ठिकाणी हनुमान चालीसाचे पठण केले.या सुंदर अशा राबवलेल्या उपक्रमाबद्दल समतीच्या सर्व सदस्यांचे व मार्गदर्शकांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
