प्रतिनिधी प्रविण वाघमोडे भिगवण
२८ फेब्रुवारी १९२८ रोजी डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.
राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान संचलित विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये १२६ प्रकाराच्या विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले . या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे सचिव विजयभैय्या थोरात, संतोष थोरात सर, अजय थोरात सर यांच्या हस्ते करण्यात आले .या उपक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष श्री बापूराव थोरात सर, संचालिका संगीताताई थोरात , प्राचार्य वंदना थोरात मॅडम आदींच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. सध्याचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे असल्याने विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सौरऊर्जेचा वापर , स्वयंचलित पथदिवे , टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तु , शेतीची उपकरणे ,आधुनिक तंत्रज्ञान हरित शेती तसेच नवनवीन प्रकल्प सादर केले .या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळण्यास मदत होईल अशी आशा संस्थेचे अध्यक्ष बापुराव थोरात यांनी बोलताना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदाळे मिस यांनी केले. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले ठेवण्यात आल्याने नागरिकांसह परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनीही प्रदर्शन पाहण्यास गर्दी केली होती. विज्ञान प्रकल्पातील सोलार ऊर्जा वापर स्वयंचलित पथदिवे, हरीत शेती उपकरणे कुतूहलाचा विषय ठरले. तसेच यावेळी रंगोत्सव सेलिब्रेशन अँड ऑर्गनायझेशन फॉर इंटरनॅशनल कॉम्पिटिशन मुंबई फाउंडेशन यांच्यावतीने इंटरनॅशनल कॉम्पिटिशन घेण्यात आलेली होती. या आर्ट कॉम्पिटिशन मध्ये आपल्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता त्या सहाही विद्यार्थ्यांच इंटरनॅशनल लेव्हलला निवड झालेली आहे. तसेच त्यांना प्राईज डिस्ट्रीब्यूशन करण्यात आले.
