Breaking Ticker

आई म्हाळसा देवी मंदिरात चैत्र नवरात्र निमित्ताने व विश्वशांतीच्या उद्देशाने सामूहिक 114 दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचन संपन्न


प्रतिनिधी शहादा 

       नुकतेच मंगळवारी दिंडोरी प्रणित मामाचे मोहिदा केंद्र व आई म्हाळसादेवी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दुपारच्या वेळी श्री प्रत्यँगिरा चंडी पाठ परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने जागतिक महायुद्ध परिस्थिती निवारणार्थ तसेच संरक्षण व विश्वशांतीसाठी  सेवेसाठी आयोजित करण्यात आले होते. मोहिदा केंद्र यांनी मोठ्या प्रमाणात विश्वशांतीसाठी दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे आयोजन केले असून या अगोदर सप्तशृंगी मंदिरात देखील अशाच प्रकारचे पाठ वाचन घेण्यात आले. 

      शहरातील आई म्हाळसा देवी मंदिरात एकूण 114 श्री प्रत्यंगीरा दुर्गा सप्तशतीचे सामूहिक पाठ वाचन झाले. आई म्हाळसा देवी मंदिरात चैत्र नवरात्र निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. जागतिक विश्वशांती व्हावी व महायुद्ध परिस्थिती निर्वारणार्थ व संरक्षणासाठी या पाठाचे वाचन करण्यात आल्याने परिसरात भक्तिमय वातावरणासोबतच देशभक्ती च्या एक उत्साह संचारला होता. परमपूज्य गुरुमाऊली यांनी विश्वशांतीसाठी अशा प्रकारच्या पाठाचे आयोजन करण्याचे आदेश दिल्याने शक्य होतील तेवढे पाठवाचन करण्याच्या संकल्प मोहिदा केंद्राने घेतला आहे. यानंतर अंबाजी मंदिरात शुक्रवारी अशाच प्रकारचे पाठाचे आयोजन करण्यात आले असल्याने जास्तीत जास्त सेवेकरी बंधू भगिनींनी यात सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा केंद्राच्या सेविकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. 

        भारतात श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा या ठिकाणी श्रीकृष्णाचे मंदिर उभे राहावे यासाठी श्रीकृष्ण मंदिर न्यास समिती यांच्यामार्फत भारत देशातील नागरिकांकडून सह्यांची मोहीम राबविली जात आहे. यासाठी श्रीकृष्ण मंदिर न्यास समिती नंदुरबार जिल्हा महिला अध्यक्ष राजश्री सोनार व जिल्हा संयोजक प्राध्यापक गणेश सोनवणे यांनी उपस्थित नागरिकांकडून मथुरा येथे श्रीकृष्ण मंदिराचे भव्य मंदिर व्हावे यासाठी आपण सर्व यात सामील व्हावे असे आव्हान केले. यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. असे विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम आई म्हाळसा देवी मंदिर सेवा समितीमार्फत राबविण्यात येतात. मंदिर परिसरात ज्यावेळी पाठाच्या आयोजन होते त्यावेळी आवर्जून गोमाता पाठ श्रवण व प्रसादासाठी येत असते त्याची प्रचिती या वेळेच्या पाठी वाचनात देखील आली. चैत्र नवरात्र ची सांगता पौर्णिमेच्या दिवशी होणार असून त्या दिवशी मंदिराच्या सेवेकरी पप्पू पाटील यांच्यामार्फत भंडारा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भंडारा प्रसादाच्या लाभ सर्वांनी घ्यावे असे आवाहन मंदिराचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गणेश सोनवणे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.