Breaking Ticker

इयत्ता 8 वी NMMS परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश


प्रतिनिधी शहादा 

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2025–26 मध्ये शाळेतील
विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

           या परीक्षेसाठी इयत्ता 8 वी मधील एकूण 91 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी 20 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून शाळेच्या यशात भर पडली आहे. विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी शाळेतील समिती प्रमुख श्रीमती रोहिणी मॅडम,श्री सुशील साळुंखे सर श्रीमती रत्ना मॅडम, श्रीमती भावना मॅडम, श्रीमती गुजर मॅडम, श्री शर्मा सर,सुरेश जगदाळे सर या  शिक्षकांनी विशेष मार्गदर्शन केले होते. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेचा निकाल उंचावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा पाटील मॅडम, उपमुख्याध्यापक  सुरेश जाधव, उपप्राचार्य  पी. बी. पाटील, पर्यवेक्षक विपिन पाटील , विलास जावरे या पदाधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.