सत्यनारायण महापूजा, रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शहादा प्रतिनिधी
महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेशच्या सीमेवर, सातपुड्याच्या पायथ्याशी आणि गोमाई नदीच्या तीरावर वसलेले, नंदुरबार जिल्ह्याची आर्थिक राजधानी तसेच “सहकाराची पंढरी” म्हणून ओळखले जाणारे शहादा शहर सामाजिक, आर्थिक आणि सहकार क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. अशा या शहादा शहरातील दि. हस्ती को-ऑपरेटिव्ह बँक लि., दोंडाईचा – शाखा शहादा यास यंदा 24 वर्षे पूर्ण होत असून 25 व्या वर्धापन दिनात पदार्पण झाले आहे.
या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त शाखेत विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सत्यनारायण महापूजा, रक्तदान शिबिर तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिर यांचा समावेश होता. या सर्व उपक्रमांना शहादा शहरातील नागरिक, ग्राहक, सभासद आणि हितचिंतकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात 38 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले, तर मोफत आरोग्य तपासणी शिबिरातही 140 नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. समाजाभिमुख कार्यातून बँकेने आपल्या सामाजिक बांधिलकीची पुन्हा एकदा जाणीव करून दिली.या प्रसंगी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. यामध्येदि.हस्ती को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन श्री. कैलास कांतीलाल जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच
श्री. आनंदकुमार मूलचंद जैन – चेअरमन, शहादा शाखा.
श्री. विजयकुमार नोतनदास धनकानी – व्हाईस चेअरमन
सल्लागार समिती सदस्य श्री. पारसमल हरकचंद जैन, श्री. विजयप्रकाश ओमप्रकाश शर्मा, श्री. अतीन मनुभाई पटेल, श्री. कल्पेश पुखराज जैन, श्री. सिद्धार्थ दिलीप जैनतसेच शाखा व्यवस्थापक श्री. कन्हैया जाधवभाई पटेलयांची उपस्थिती लाभली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी बँकेच्या 24 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव करत, शहादा शाखेने ग्राहकांचा विश्वास, पारदर्शक सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांच्या बळावर शहरात एक वेगळी ओळख निर्माण केल्याचे सांगितले. भविष्यातही बँक ग्राहकाभिमुख सेवा, सहकार आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून प्रगतीची नवी शिखरे गाठेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.“दि. हस्ती को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, दोंडाईचा – नातं विश्वासाचं… 25 वर्षं आपल्या प्रगतीचं…”
या घोषवाक्याला साजेसा, श्रद्धा, सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा सुंदर संगम असलेला हा वर्धापन दिन सोहळा अत्यंत उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाला.
