Breaking Ticker

गोपाळकुमार कळसकर यांना राज्यस्तरीय 'डायनामिक इंडिया अवार्ड' जाहीर

 



 ग्रामीण प्रतिनिधी - गोपाळकुमार कळसकर. 

भुसावळ : आंतरराष्ट्रीय नामांकन (आय एस ओ ९००१- २०१५) प्राप्त  'डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया' द्वारा आयोजित ' राज्यस्तरीय  डायनॅमिक इंडिया अवॉर्ड  २०२६' साठी  आयुध निर्माणी वरणगाव येथील गोपाळकुमार चांगदेव कळसकर यांची निवड करण्यात आली.  शैक्षणिक सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी  गोपाळकुमार कळसकर यांना हा अवार्ड प्रदान करण्यात येणार आहे.  'डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया' व  'मातृशक्ती संतोषी फाउंडेशन' द्वारे सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी "राज्यस्तरीय  डायनॅमिक इंडिया अवॉर्ड २०२६ पुरस्काराचे" आयोजन करण्यात आले. यामध्ये पत्रकारिता, शिक्षण, साहित्य, सामाजिक, खेळ, राजकीय, सौंदर्य, डॉक्टर, वकील, महिला, सहकार, पतसंस्था, कला, इत्यादी क्षेत्रात कर्तृत्व घडवणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. गोपाळ कळसकर यांनी विविध वृत्तपत्रांतून वंचित, शोषित  घटकांच्या अन्यायाला वाचा फोडली आहे. परिसरात संविधान जनजागृती, महापुरुषांचे जयंती कार्यक्रम, मोफत रक्तदान, वृक्ष लागवड, विविध सामाजिक प्रश्नावर जनजागृती, विद्यार्थी - पालक सुसंवाद  कार्यशाळा, रन मॅरेथॉन, मोफत गणपती मूर्ती कार्यशाळा, महापुरुषांची पुस्तके मोफत वाटप , परिसरातील कर्तृत्ववान व गुणवंतांचा सत्कार असे विविध उपक्रम त्यांनी आजवर राबवले आहेत.  त्यांना पहाट फाउंडेशन, आदर्श रायगड वृत्तवाहिनी,  दर्पण वृत्तपत्र, हिंदी मराठी पत्रकार संघ  अशा विविध संस्थांमार्फत यापूर्वी गौरविण्यात आले आहे. या कार्याची दखल घेत  शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील  'डायनामिक इंडिया अवार्ड २०२६' पुरस्कारासाठी  ही निवड करण्यात आली आहे.  रविवार दिनांक १५ मार्च २०२६ रोजी मलकापूर येथील भातृ मंडळ  भवनात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तिथे मान्यवरांच्या हस्ते  गोपाळकुमार कळसकर  यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या यशाबद्दल गोपाळकुमार कळसकर यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.