Breaking Ticker

उत्कृष्ट पत्रकार व समाजसेवक म्हणून रघुनाथ बेलदार यांचा साई फाउंडेशन तर्फे सन्मान.



प्रतिनिधी शहादा

       साई भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या शिर्डी येथे रामनवमीचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार व सामाजसेवक म्हणून शहादा येथील रघुनाथ बेलदार  यांना नानक साई फाउंडेशन व शिर्डी संस्थान तर्फे सातव्या नानक साईअवाॅर्ड फंक्शन कार्यक्रमात तृप्ती देसाई यांच्या हस्ते शाल व शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसंगी नानक साई फाउंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे, केंद्रीय उपाध्यक्ष प्रीतम सिंह भाटिया, श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, शिर्डी नगरपंचायतीच्या अध्यक्षा जयश्री थोरात, महिला आयोगाच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, प्रमोद अहिरे, बालाजी जाधव, देविका कुमावत, रवींद्र चव्हाण व किशोर चित्ते  आदी मान्यवर उपस्थित होते.

         या कार्यक्रमाद्वारे कला, संस्कृती, समाजसेवा, अध्यात्मिक कार्य व पत्रकारिता अशा क्षेत्रात निस्वार्थ योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. दैनिक देशदूत प्रतिनिधी म्हणून गेली पंचवीस वर्षे अखंडित पत्रकारिता व समाजसेवा या कार्याने गौरविण्यात आलेल्या रघुनाथ बेलदार यांचे जळगाव देशदूत आवृत्तीचे संपादक हेमंतजी आलोने, नंदुरबार आवृत्तीचे मुख्य उपसंपादक राकेशजी कलाल, विशाल पाठक, सुनील खेडकर, कुमावत बेलदार विकास सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष साहेबरावजी कुमावत, वर्तमान अध्यक्ष प्रफुल्ल जी कुमावत व नाशिक येथील मोहन शेलार, शहादा तालुका मराठी पत्रकार  संघाचे अध्यक्ष नरेंद्र बागले व संचालक मंडळ, विनोद बेलदार, डिगंबर बेलदार ,नाना कुमावत, विठ्ठल बेलदार, लक्ष्मण बेलदार ,नरेंद्र बेलदार ,संतोष बेलदार, प्रा. अनिल बेलदार, संदीप बेलदार, जळगाव केमिस्ट्री कुमावत क्लासेसचे संचालक विजय बेलदार, शिक्षिका बबीता बेलदार यांनी अभिनंदन केले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.