Breaking Ticker

सिरोंचा येथे स्नेहधर्म धर्मार्थ दवाखान्यात नवीन एक्स-रे मशीन लवकरच सुरू…!


माजी मंत्री तथा आ. राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या पुढाकारातून नागरिकांना दिलासा

प्रतिनिधी - सागर मूलकला, सिरोंचा 

सिरोंचा : तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य सुविधेत मोठी भर पडणार असून सिरोंचा येथील स्नेहधर्म धर्मार्थ दवाखान्यात लवकरच नवीन अत्याधुनिक एक्स-रे मशीनचे उद्घाटन होणार आहे. या सुविधेमुळे सिरोंचा तालुक्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

माजी मंत्री तथा आमदार राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या पुढाकारातून ही महत्त्वपूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध होत असून त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना मोठा लाभ होणार आहे. आतापर्यंत सिरोंचा तालुक्यात एक्स-रेची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांना तपासणीसाठी तेलंगणा राज्यात जाऊन उपचार घ्यावे लागत होते. त्यामुळे नागरिकांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत होता.ही गंभीर समस्या लक्षात घेऊन डॉ. मिताली आक्का यांच्या नेतृत्वाखाली स्नेहधर्म धर्मार्थ दवाखान्यात नवीन एक्स-रे मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरच या मशीनचे उद्घाटन होऊन नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या नव्या सुविधेमुळे सिरोंचा तालुक्यातील रुग्णांना वेळेवर तपासणी आणि उपचार मिळण्यास मदत होणार असून बाहेरच्या राज्यात जाण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.