Breaking Ticker

महिला दिनानिमित्त थोर महिलांना अभिवादन दत्तकृपा टी स्टॉल येथे महिला दिन साजरा



श्री क्षेत्र माहूर ( प्रवीण बरडे )

सनदी अधिकारी प्रशांत भाऊ राठोड यांच्या पुढाकारातून उभारलेल्या श्री दत्तकृपा टी स्टॉल येथे जगभरासह भारत देशातील थोर महिला सह स्वर्गीय पीपळीबाई पूरसिंग राठोड यांना अभिवादन करून दि 8 रोजी महिला दिन आनंदात साजरा करण्यात आला

माहूर तहसील कार्यालयाचा गेट समोर सनदी अधिकारी प्रशांत भाऊ राठोड यांच्या पुढाकारातून स्व पिपळीवर पूरसिंग राठोड यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या विजय कांबळे यांच्या श्रीदत्त कृपा टी स्टॉल येथे वर्षभर मान्यवरासह थोरा मोठ्यांची जयंती पुण्यतिथी साजरी होत असते तसेच मान्यवरांचे वाढदिवसही साजरी केले जातात त्यानिमित्त जगभरातील थोर कर्तबगार महिलांच्या सन्मानार्थ प्रशांत भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिन साजरा करण्यात आला

श्री दत्तकृपा स्टॉलचे संचालक विजय भाऊ कांबळे यांनी पुढाकार घेऊन महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या तथा महिला पत्रकार सौ पद्माताई गिऱ्हे यांच्या हस्ते थोर महिलांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले यावेळी वंदना राठोड अंगणवाडी शिक्षिका शिलाताई कांबळे अंगणवाडी मदतनीस माजी शिक्षिका सरस्वतीबाई गरुडे प्रेमिलाताई गरुडे कर्मचारी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय चैताली राठोड,आरती मोहिते, अनुसया हजारे ,मंदाबाई गेडाम यांच्यासह महिलांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.