Breaking Ticker

गरजू रुग्णाच्या सेवेसाठी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून रुग्णवाहिका उपलब्ध




 शहादा प्रतिनिधी 


 येथील व परिसरातील सर्व सामान्य रुग्णांसह आदिवासी समाजाच्या रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका मिळत नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांची विधानपरिषदेच्या आमदारपदी निवड झाल्यावर शहादा येथील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे शहादा व परिसरातील रुग्णाकरिता कायमस्वरूपी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती.शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या विनंतीला प्रतिसाद देत आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी लवकरच रुग्णवाहिका उपलब्ध देण्याचे आश्वासन दिले होते.          

      आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी आश्वासनाची पूर्तता करीत शहादा शहर व परिसरातील रूग्णांच्या सेवेकरिता रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली असुन,नंदुरबार येथे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शहादा येथील शिवसेना शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल, शिवसेना जेष्ठ नेते सुपडू खेडकर, युवा सेना उप जिल्हा प्रमुख राजरत्न बिरारे,हेमंत सुर्यवंशी,गणेश माळी,

धनराज जायसवाल,लखीचंद जायसवाल यांच्याकडे रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आली.यावेळी आमदार चंदकांत रघुवंशी यांच्या सह नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील आबा पाटील,हस्ती बैंकचे अध्यक्ष ईश्वर जैन,बांधकाम सभापती देवेंद्र जैन,रोहिदास राठोड,अनिल पाटील,दुर्गेश वैष्णव व पप्पू गिरासे उपस्थित होते.यावेळी मनलेश जायसवाल यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार चंदकांत रघुवंशी आभार मानले.

    शहादा शहर व परिसरातील गरजू रुग्णांच्या सेवेसाठी ‘ना नफा-ना तोटा,या तत्वावर चोवीस तास रुग्णवाहिका उपलब्ध राहणार असुन रुग्णवाहिका करिता शहादा येथील शिवसेना संपर्क कार्यालय येथे संपर्क केल्यास तसेच शहादा तालुका व शहराच्या शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनां संपर्क साधून अथवा  शिवसेना तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांच्या ९४२२७९०१२६,९११२९६२५२५ मोबाईल वर संपर्क केल्यास तात्काळ रुग्णवाहिका सेवेकरिता उपलब्ध राहणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.