Breaking Ticker

स्वामी समर्थ महाराजाच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले



प्रतिनिधी शहादा

       येथील वृंदावन नगर श्री स्वामी समर्थ केंद्रात स्वामी जयंती निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी काकड आरती पासून सुरुवात करण्यात आली. पहाटेची  मंत्रोपचार करत महाराजांचे शोडपचार पूजा करण्यात आली. अगदी भक्तिमय वातावरणात महिला व पुरुष वर्गांनी केंद्रात स्वामी चरित्र सारामृताचे पाठ वाचन केले. स्वामी जयंती असल्यामुळे आज स्वामी महाराजांच्या जन्मदिवस साजरा करण्याची प्रथा आहे. यावेळी दुपारी बारा वाजता केंद्रातर्फे भंडारा प्रसादाचे आयोजन करण्यात येते. सोबतच महिला व पुरुष वर्ग घरून जेवणाचे डबे आणून त्याच ठिकाणी प्रसादाचे सेवन करतात. 

         शहरातील जायंट्स ग्रुप व जायंट सहली ग्रुप यांच्यामार्फत दुपारी 12 ते 4 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्वामीभक्त परिवारातील 40 महिला व पुरुष वर्गांनी रक्तदान केले. धुळे येथील नवजीवन ब्लड बँकेचे संयोजक यांच्यामार्फत रक्त संकलन करण्यात आले. रक्तदात्यांचे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जायंट्स ग्रुपचे सर्व सन्मानित पदाधिकारी उपस्थित होते. केंद्राचे पदाधिकारी भरत पाटील गोरख चौधरी सह संचालक मंडळ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.