हिमायतनगर प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हिमायतनगर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
हा भव्य कार्यक्रम बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सायं. ४ वाजता परमेश्वर मंदिराजवळ, बस स्टँड परिसर, हिमायतनगर येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे स्वरूप दोन सत्रांमध्ये विभागण्यात आले असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत तो पार पडणार आहे.
पहिले सत्र (सायं. ४ वाजता):
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. हेमंत पाटील (या.खासदार तथा विधानसभा आमदार) उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन मा. श्री बाबुराव पाटील कोहळीकर ( आमदार, हदगाव हिमायतनगर) यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. मधुसूदन कुलथे (केंद्रीय अध्यक्ष, राज्य मराठी पत्रकार परिषद) उपस्थित राहणार आहेत.
दुसरे सत्र (सायं. ६.३० वाजता):
या सत्राचे अध्यक्ष मा. श्री. मधुसूदन कुलथे राहणार असून उद्घाटन मा. श्री. माधवराव पाटील जवळगांवकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मा. खा. नागेश पाटील आष्टीकर (खासदार, हिंगोली लोकसभा) तसेच मा. श्री. शेख रफीक नगराध्यक्ष हिमायतनगर यांची उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार, सांस्कृतिक सादरीकरणे तसेच प्रेरणादायी भाषणे होणार आहेत. विशेष आकर्षण म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा गायक संतोष जोंधळे यांचा बहारदार भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढणार आहे. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी, मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्यचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष शुद्धोधन हानवते, नांदेड जिल्हा अध्यक्ष देवानंद गुंडेकर, नांदेड जिल्हा सहसंघटक गंगाधर गायकवाड दिघीकर, नांदेड जिल्हा उपाध्यक्ष राम चिंतलवाड हिमायतनगर तालुका सचिव सुभाष गुंडेकर, नांदेड जिल्हा संघटक प्रशांत राहुलवाड , तालुका अध्यक्ष अनिल नाईक, तालुका उपाध्यक्ष मनोज तपासकर तालुका शहर अध्यक्ष यादव दत्ता येनेकर, तालुका शहर उपाध्यक्ष सदाशिव पतंगे, तालुका कार्याध्यक्ष कैलास कांबळे सह सर्व पत्रकार बांधव व नागरिक कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आयोजित या भव्य कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
