प्रतिनिधी शहादा
जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधत शहादा नगरपरिषद संचलित पुज्य सानेगुरुजी वाचनालय येथील सार्वजनिक वाचनालयातर्फे पुस्तकांचे प्रदर्शन खुला आयोजित करण्यात आले. आज, २३ एप्रिलपर्यंत वाचनालयात प्रदर्शन भरविण्यात आले असून तीनशेहून अधिक दुर्मिळ ग्रंथ वाचकांना पाहता आली.
वर्षा नुवर्षांपासून साहित्य चळवळ जपणाऱ्या दुर्मिळ ग्रंथांचा ठेवा वाचनालयांकडे असला तरी त्याबाबत वाचकांना फारशी माहिती नसते. दुर्मिळ ग्रंथांबाबत केवळ ऐकीव माहिती असली तरी त्याचे वाचन मात्र केले जात नाही. वाचनसंस्कृती जपणाऱ्या या ग्रंथांची माहिती पुज्य सानेगुरुजी सार्वजनिक वाचनालयातर्फे वाचकांपर्यंत पोहोचविली जात असते. अनेक दुर्मिळ ग्रंथ वाचनालयात उपलब्ध असून त्यांचे जतनही केले जाते.
इंग्रजी साहित्यीक सेक्सपियर यांच्या जयंती निमित्त २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधत दरवर्षी नवे प्रयोग करणाऱ्या वाचनालयाने यंदा दुर्मिळ पुस्तकांची निवड केली आहे. विविध विषयांचे पैलू उलगडणारे दुर्मिळ ग्रंथ, शब्दकोष, कोषवाङ्मय यांसारख्या ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले.
या दिनाच्या निमित्ताने जगातील लोकाना पुस्तक वाचनाची आवड निमााण व्हावी. व तसेच जगातील साहित्याचा बहुमान व्हावा. या साठीच जागतिक पुस्तक दिन म्हणून संपूर्ण जगासह भारतामध्ये साजरा करण्यात येतो.
या प्रसंगी राष्ट्रसेवा दलाचे जिल्हाध्यक्ष प्रा.आर.टी.पाटील, बालकवी रमेश महाले, कुंभारसर, गोविंद खेडकर, किशोर पाटील, कांतीलाल चौधरी, शोहेब अहेमद, रोहन कुवर तसेच वाचक विद्यार्थी नंदिनी पाटील, रोहित जाधव, तानिक्षा गिरासे, सनी भ्रामरे, कुणाल चौधरी, साक्षी धर्के, अंजली सोलंकी, दिपाली निकुंभे, धनंजय पाटील, शाक्षा पाटील, प्रथमेश पाटील, अनिल कापुरे, दर्शन साळवे, माधुरी देशमुख, दिपाली मोरे, सोनिया भालेराव, शुभम वळवी, आशिष सोनवणे, पुष्कर भामरे, मिलेश पावरा, नितीन बागुल या निमित्ताने प्रसंगी वाचनालयातील सर्व विद्यार्थी व वाचक कर्मचारी उपस्थित राहून प्रत्यक्ष ग्रंथ प्रदर्शनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रम आयोजन ग्रंथपाल गांगुर्डे चेतन यांनी तर प्रास्ताविक रमेश महालेसर आभार प्रदर्शन प्रा.आर.टी.पाटीलसर यांनी केले.
