Breaking Ticker

एमएसएमई “सक्षम” अवेयरनेस कार्यशाळा शहाद्यात उत्साहात संपन्न



शहादा प्रतिनिधी (प्रा गणेश सोनवणे)

           भारतीय जैन संघटना, शहादा यांच्या वतीने एमएसएमई संदर्भातील “सक्षम” अवेयरनेस कार्यशाळा दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी सुघोषा घंट मंदिर, दादावाडी येथे उत्साहात पार पडली. उद्योग, व्यवसाय व स्वरोजगाराला चालना देण्यासाठी आयोजित या कार्यशाळेत एमएसएमई अंतर्गत मिळणारे लाभ, विविध कर्ज योजना, सबसिडी, उद्यम (UDYAM) नोंदणी, GeM व MSME Global Mart यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कांतीलालजी टाटीया होते. प्रमुख अतिथी म्हणून जैन संघ अध्यक्ष ॲड. प्रदीप टाटीया, मूर्तिपूजक संघ अध्यक्ष विजय चोपडा, साधुमार्गी संघ अध्यक्ष फुलचंद लोढा, तेरापंथी सभा अध्यक्ष कैलास संचेती तसेच खान्देश विभागीय उपाध्यक्ष भवरलाल जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.

       या प्रसंगी अहमदाबाद येथील प्रख्यात व्याख्याते निरंजन जुवा यांनी अत्यंत सोप्या व प्रभावी भाषेत एमएसएमई योजनांचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी उद्योजकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन व्यवसाय वाढवावा, असे आवाहन केले. कार्यशाळेस उद्योग, व्यवसाय, स्वरोजगार क्षेत्रातील उद्योजक, युवक, महिला उद्योजिका, दुकानदार तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. पारस पापड उद्योग समूहाचे संचालक पारसमल जैन, कचरूलाल नाहटा, प्रा. संपत कोठारी, संजय चोपडा, यश टाटीया, कल्पेश चोरडिया, किशोर चोरडिया, डॉ. राजेश जैन, डॉ. स्मिता राजेश जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

        कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बीजेएस शहर अध्यक्ष नंदकिशोर चोरडिया व सेक्रेटरी संदीप चोरडिया यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. मनोज बाफना यांनी केले.ही कार्यशाळा उद्योजकांसाठी अत्यंत मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.