Breaking Ticker

पिंपळे निलख रक्षक चौकातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला .आ. शंकर जगताप यांच्या प्रयत्नांना मोठे यश



जिल्हा प्रतिनिधी पुणे 

        पिंपरी चिंचवड-पिंपरी चिंचवड व पुणे शहर या दोन महानगरांना जोडणारा रावेत ते पुणे शहर मार्गावरील रक्षक चौक येथील उड्डाणपुलाचे काम बरेच दिवस झाले पूर्ण होऊन सुद्धा वाहतुकीसाठी उड्डाणपूल खुला करण्यात आला नव्हता यामुळे वाहन चालकांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती ही गैरसोय व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तात्काळ उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करावा म्हणून चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा शंकर भाऊ जगताप यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला होता. आमदार जगताप यांच्या या पत्रव्यवहाराची तात्काळ प्रशासनाने दखल घेऊन सर्व तांत्रिक व सुरक्षाविषयक क्रिया पार पाडून महापालिकेने तात्काळ हा उड्डाणपूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला केला आहे. 

     रक्षक चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असले तरी तो सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला न केल्यामुळे  व्यवसायिक नोकरदार व सर्व सामान्य जनता यांना वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत होता. ही गैरसोय दूर करण्यासाठी मा आमदार शंकर भाऊ जगताप यांनी तात्काळ पावले उचलत महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करून सर्व अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले. महापालिकेने यावर तात्काळ कारवाई करीत सुरक्षाविषयक ऑडिट व इतर सर्व तांत्रिक क्रिया पूर्ण करून शेवटी उड्डाणपूल सर्वसामान्यांसाठी खुला करून वाहन चालकांची गैरसोय दूर केली आहे त्यामुळे परिसरातून चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर भाऊ जगताप व महापालिका प्रशासन यांचे जनतेतून आभार मानले जात आहे. या उड्डाणपुलामुळे औंध ते सांगवी फाटा आणि पुढे रावेत पासून किवळेपर्यंतचा प्रवास अधिक वेगवान सुटसुटीत व सिग्नल मुक्त झाला आहे. तसेच औंध बीआरटी मार्गावरील वाहतूक कोंडी पूर्णपणे सुटण्यास मदत झाली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.