27 मे पर्यत दावे-हरकती सादर करण्याचे आवाहन
परभणी, दि. २२ (जिमाका) : परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील सर्व मतदारांना सूचित करण्यात येते की. मतदार नोंदणी नियम, १९६० अन्वये सदर मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आलेली असून तिची एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली, जिल्हा परिषद परभणी, हिंगोली, परभणी शहर महानगरपालिका परभणी, उपविभागीय अधिकारी कार्यालय, सेलू, परभणी, गंगाखेड, पाथरी, हिंगोली, वसमत, कळमनुरी, तहसिल कार्यालय, पुर्णा, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, सेलु, मानवत, जिंतुर, वसमत, कळमनुरी, हिंगोली, पालम, औंढा, सेनगाव, पंचायत समिती पुर्णा, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, सेलू, मानवत, जिंतुर, वसमत, कळमनुरी, हिंगोली, पालम, औंढा, सेनगाव, नगर परिषद, पुर्णा, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, सेलु, मानवत, जिंतुर, वसमत, कळमनुरी, हिंगोली, नगर पंचायत पालम, औंढा, सेनगाव येथे कार्यालयीन वेळेत मतदार यादी पाहणीसाठी उपलब्ध आहे.
प्रारूप मतदार यादी दिनांक २१ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर यादीबाबत कोणत्याही व्यक्तीस नाव समाविष्ट करण्याचा दावा, नाव वगळण्याबाबत हरकत किंवा नोंदीतील तपशील दुरुस्तीबाबत हरकत असल्यास, ती विहित नमुना क्र. १७, ७ किंवा ८ मध्ये आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावी. अशा सर्व दावे व हरकती या दिनांक २७ मे २०२६ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष सादर कराव्यात किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी या पत्त्यावर टपालाद्वारे पाठवाव्यात, जेणेकरून त्या विहित मुदतीपूर्वी प्राप्त होतील. तसेच, सदर प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींची कार्यवाही पूर्ण करून अंतिम मतदार यादी दिनांक ३१ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी (परभणी हिंगोली प्राधिकारी स्थानिक प्राधिकारी मतदार संघ) संजयसिंह चव्हाण यांनी कळविले आहे.
