Breaking Ticker

सिंदगी ग्रामपंचायत कार्यालयात दिव्यांगाचा निधी वाटप



कमलाकर वाघमारेप्रतिनिधी जळकोट

    आज दिनांक १ मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय केकत सिंदगी च्या वतीने सकाळी गावच्या प्रथम नागरिक सरपंच बायनाबाई संदिपान कांबळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण  करण्यात आले व त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या स्थानिक निधीतील पाच टक्के  दिव्यांग निधी वाटप करण्यात आला.

     या दिव्यांग निधी वाटप कार्यक्रमासाठी  जळकोट पंचायत समिती चे सहाय्यक प्रशासन अधिकारी सचिन काडवादे, वरिष्ठ सहाय्यक नितीन मुस्कावाड, कनिष्ठ सहाय्यक संजय घोरपडे, शांतवीर कासनाळे, अरविंद पाटील, दुर्गादास माने, प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव होणराव, पत्रकार कैलास पाटील गोंड, राजाराम हंगरगे, आदी उपस्थित होते. 

   यापूर्वी जळकोट तालुक्यातील ४६ ग्रामपंचायत पैकी  बेळसांगवी, लाळी खुर्द, धामणगाव, माळहिप्परगा, कोळनूर, हळदवाढवणा, उमरगा रेतू, बोरगाव, शेलदरा, वडगाव, ढोरसांगवी, रावणकोळा,तिरूका करंजी, १४ या ग्रामपंचायतीकडून दिव्यांगासाठीचा राखीव पाच टक्के निधी वितरित करण्यात आलेला होता. 

    केकत सिंदगी येथील 14 दिव्यांगाना प्रत्येकी 500 रुपये याप्रमाणे एकूण सात हजार रुपये धनादेश वितरित करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव होनराव, व सचिव नामदेव केंद्रे हे प्रमुख उपस्थित होते. तर.गावातील धनराज गोंड, शिवाजी दळवे, नामदेव दळवे, आकाश कांबळे, नामदेव केंद्रे, आशाताई केंद्रे, कविता सोनकांबळे, सठवाजी मुंडे, अजीम पिंजारी, तुकाराम सोनकांबळे, रमा सोनकांबळे, या उपस्थित दिव्यांगाना उपस्थित मान्यवरांचा हस्ते धनादेश वाटप करण्यात आला 

               यावेळी सरपंच बायनाबाई कांबळे, राजाराम हंगरगे, पत्रकार कैलास पाटील, प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव होणराव, माजी. सरपंच सुर्यकांत दळवे, जगन्नाथ दळवे, ममताताई कांबळे, भुजंग कांबळे, हौसिराम कांबळे, बालाजी मिरजगावे, अमीनसाब मोमीन, कासीम पिंजारी, आदीसह गावातील नागरिक उपस्थित होते

         या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार कैलास पाटील यांनी केले तर आभार नामदेव केंद्रे यांनी मांडले


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.