Breaking Ticker

झरी फाटा ते पाडळी रस्ता जे.सी.बी.ने उखडला



अर्धवट स्थितीत काम सोडून ठेेकेदार पळाला 


मुनीर अब्बास शाह बाजार सावंगी

खुलताबाद  तालुक्यातील झरी फाटा ते पाडळी हा चार किलोमीटरचा संपूर्ण रस्ता ठेकेदाराने जेसीबीने अनेक दिवसांपासून उखडून ठेवला असून अर्धवट स्थितीतील काम सोडून ठेकेदार फरार झाला आहे. उखडलेला रस्ता व त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे यामध्ये पडून अनेक नागरिक जखमी होत असून, रस्ता तयार करण्याची अनेकवेळा मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने दरेगावचे शिवसेनेचे सरपंच संदीप गायकवाड यांच्यासह परिसरातील गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

तालुक्यातील झरी फाटा ते पाडळी दीड किलोमीटरचा हा इतर जिल्हा मार्ग क्रमांक १३२ असून, या मार्गावरून अनेक गावांतील नागरिकांची वर्दळ असते. कंत्राटदराने हा संपूर्ण रस्ता सहा महिन्यांपूर्वी जेसीबीने उखडून ठेवला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे, मुरूम व उखडलेले पृष्ठभाग असल्यामुळे मागील सहा महिन्यांपासून अपघात होऊन अनेक

अर्धवट काम सोडून ठेकेदार फरार

नागरिक जखमी झाले आहेत. या अपघातात कोणाचे हातपाय मोडले, तर कोणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने कायमचे अपंगत्व आले आहे. या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाचे रत्नपूर उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांना अनेकवेळा लेखी व तोंडी स्वरूपात विनंत्या करण्यात आल्या. मात्र, संबंधित अभियंते या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत. सरपंच संदीप गायकवाड यांनी उपअभियंता नीरज वीरावरडेकर यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारत हा रस्ता त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.