Breaking Ticker

अवैध हातभट्टी निर्मिती वाहतूक व विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई

 


अंबाजोगाई प्रतिनिधी:- अंबाजोगाई विभागांतर्गत अंबाजोगाई आणि परळी तालुक्यातील विविध ठिकाणी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई व निरीक्षक भरारी पथक क्रमांक 2 यांनी संयुक्त पणे 30 मे 2026ते 6 जुन 2026 या कालावधीत अंबाजोगाई व परळी तालुक्यातील अवैध हातभट्टी निर्मिती वाहतूक व विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई करून एकूण 19 गुन्हे दाखल करून 1118 लिटर हातभट्टी दारू 12350 लिटर रसायन,04 दुचाकी वाहन व 01घोडा (हातभट्टी वाहतुक) करताना जप्त करून एकूण 1204150 रुपयेचा मुद्देमाल जप्त केला.

      सदरील कारवाई मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क बीड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री डी.डी.चौरे निरीक्षक,, श्री एस टी.कुबडे उपनिरीक्षक,श्री जे. व्ही. कोरे उपनिरीक्षक, श्री ए. एम. सोनकांबळे, श्री आर.एम.पारधे, उपनिरीक्षक तसेच सर्वश्री, आर.बी.कदम, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री एस एम लोमटे, के. एस. जारवाल, जी.डी.पोतलवाड, आर.एल.जारवल, ए.पी.कदम, एस.व्हि.धस, एस.एस.चाटे, व्हि.एस.वायबट, कुमारी रागिणी मुंडे, एस.एस.घुले, व एस.एस. ढवळे तसेच महिला जवान यांनी सदरील कारवाई पार पाडली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.