Breaking Ticker

पुण्यात डॉक्टरची अपॉईंटमेंट मिळवण्यासाठी तरुणी बनली 'लेडी सिंघम



खाकी वर्दीत रुबाब दाखवणाऱ्या तोतया महिला PSI ला लष्कर पोलिसांकडून अटक!

​पुणे जिल्हा (प्रतिनिधी) अनिल कांबळे

पुण्यातील कॅम्प परिसरातून एक अत्यंत धक्कादायक, तितकाच थक्क करणारा आणि तितकाच मजेशीर प्रकार समोर आला आहे. पोलीस दलात कोणतीही नोकरी नसताना, अंगावर खाकी वर्दी आणि खांद्यावर चक्क पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाचे स्टार लावून फिरणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीला लष्कर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. केवळ डॉक्टरांची अपॉईंटमेंट लवकर मिळावी म्हणून या तरुणीने 'लेडी सिंघम'चे रूप धारण केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

​नेमकी घटना काय?

​ही धडक कारवाई शनिवार, ६ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कॅम्पमधील व्हिक्टरी थिएटरासमोरील 'संजीवन स्किन क्लिनिक' जवळ करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव समिना आसिफ इनामदार उर्फ समीना आयुब पठाण (वय 25 वर्ष रा महाळुंगे) असे असून ती एका खाजगी नामांकित कंपनीत नोकरी करते.

               पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या घटनेमाचे जे कारण समोर आले, ते ऐकून पोलीसही चक्रावन गेले. समीना ला कॅप मधील संबंधित स्किन  क्लिनिक मध्ये उपचारांसाठी डॉक्टरांची अपॉइंटमेंट हवी होती. मात्र तिथे रुग्णांची मोठी गर्दी असल्याने, आणि वेळेत आपारमेंट मिळत नसल्याने तिने एक अजब शक्कल लढवली. तिने थेट पोलीस उपनिरीक्षकाचा (PSI) गणवेश परिधान केला आणि क्लिनिक मध्ये गेली. मात्र तिची देहबोली आणि संशयास्पद वागणूक पाहून तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांना संशय आला. अन" लेडी सिंघम 'चा बेत फसला.

                    क्लिनिक मधील कर्मचाऱ्यांनी तात्काळ लष्कर पोलीस स्टेशनला याची माहिती देऊन पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी सदर महिलेला खाकी वर्दीचा गैरवापर केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. 

         पुणे पोलिसांचे आवाहन 

सरकारी पद गणवेश अथवा अधिकाराचा गैरवापर करणे हा गंभीर कायदेशीर गुन्हा आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी पडू नये आणि संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. केवळ एका स्कीन क्लिनिकच्या अपॉइंटमेंट साठी थेट पोलीस उपनिरीक्षक बनण्याचा भेत तिच्या अंगलट आला असून पुणे परिसरात या अजब प्रकाराची जोरदार चर्चा रंगत आहे.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.