Breaking Ticker

युवक व्यसनाच्या आहारी, कुटुंबे संकटात; आगारवाडीकरांचे पोलिसांना निवेदन”



 प्रतिनिधी धनंजय माळेकर  

रिसोड तालुक्यातील आगारवाडी येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे गावातील शांतता व सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी रिसोड पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.

गावातील महिला व पुरुष मंडळींनी एकत्र येत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अवैध दारू विक्रीमुळे युवक आणि पुरुषांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत असून त्याचा थेट परिणाम कुटुंबांवर होत आहे. अनेक घरांमध्ये कौटुंबिक कलह वाढत असून काही संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

तसेच घरातील लहान मुलांवरही या वातावरणाचा गंभीर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दिवसभर कष्ट करणाऱ्या महिलांना घरातील व्यसनाधीन व्यक्तींमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.

गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी, अन्यथा भविष्यात गावात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढून अशांतता निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

गावातील शांतता कायम राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी समस्त गावकरी महिला मंडळ, आगारवाडी यांच्या वतीने करण्यात आली आहे. अवैध दारू विक्री थांबवा गावाचे भविष्य वाचवा आसे गावकरी महिला  आशा व्यक्त केली यावेळी निवेदन देण्या साठी गावातील महिला मंडळ आणि सरपंच पांडुरंग वायभासे, उपसरपंच शोभाताई शिंदे ,माजी सरपंच भागेश मुडें यांनी निवेदन दिले 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.