Breaking Ticker

मळणी यंत्रात आडकून तीस वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू


मुनीर अब्बास शाह छ.संभाजीनगर प्रतीनीधी

खुुलताबाद तालुक्यातील बाजार षसावंगी परिसरातील इंदापूर येथील बाळू बाहदुरे यांच्या गट नं ४६ शेतामध्ये कांदा विज काढण्याचे काम सुरू असताना त्याच मळणी यंत्रामध्ये संगीताबाई ताडिया तीस वर्षीय मजूर महिलेचा मृत्यू झाला आहे. मळणी यंत्र हे पाडळी येथील अन्सार शेख यांचे होते त्यांच्या मळनीयत्रा वरती मजूर म्हणून काम करण्यासाठी मध्य प्रदेशातील मजूर आले होते. यामध्ये

विक्रम सेनानी, नानीबाई विक्रम, संगीता तेडसिंग ताडिया हे मजुर काम करत होते. राहणार पाजरे ता शेंदवा जिल्हा वडवणी (मध्य प्रदेश) हल्ली मुक्काम पाडळी. अन्सार हसन शेख त्यांच्याकडेच होते. आज दुपारी चार वाजेच्या सुमारात इंदापूर शिवारामध्ये मळणी यंत्राचे काम चालू असताना टोपल्यांनी कांदा बिजवाई काढण्याचे काम चालू असताना वाऱ्यामुळे मळणी यंत्राच्या पट्ट्याकडे झोक जाऊन यामध्ये मळणी यंत्राच्या रोटर मध्ये अडकून पाठीला व कमरेला पायाला गंभीर

स्वरूपाचा मार लागल्याने संगिताबाई मयत झाली व मयतावर उतरणीय तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र बाजार सावंगी येथे डॉक्टर शुभम शिंदे यांनी केली. सदर माहिती पोलीस पाटील राम भगवान शिंदे यांनी बाजार सावंगी पोलीस चौकीला कळविले. दिलेल्या जवाब वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास बाजार सावंगी पोलीस चौकीचे  जमादार नवनाथ कोलहे हे करीत आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.