Breaking Ticker

सोबलगाव लघु पाटबंधारे धरणातील पाणी साठ्याने तळ गाठला, शेतकऱ्यांकडून गाळ उपसा



वाहतूक लघु पाटबंधारे धरण , नियम धाब्यावर


मुनीर अब्बास शाह छ.संभाजीनगर प्रतीणधी

खुुलताबाद तालुक्यातील मौजे सोबलगाव येथील सोबलगाव लघु पाटबंधारे धराणातील पाणी साठ्याने तळ गाठले असल्याचे चित्र आहे. गतवर्षी २०२४-२५ पर्जन्यमानाने सरासरी ओलांडली होती तर धरणे ओढे नाले नदी बांध पाझर तलाव केटी सर्वांना मोठा पाणी साठा झाला होता. तर तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी केले होते. तर माहे मे / जुन पर्यंत पाणी साठा टिकून होता. परंतु यंदा कडक उन्ह उष्णता वादळी वारे यामुळे पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने झपाट्याने पाणी साठा कमी झाला तर शेतकऱ्यांकडून पाणी उपसा यामुळे ही तलाव धरणे यांचा पाणी साठा कमी झाला. व सोबलगाव लघु पाटबंधारे धरणातील पाणी साठ्याने तळ गाठले.त्यात धरणाचे गाळ माती उपसा झालेला नसल्याने तलाव उतळ गाळ मय बनला आहे. सद्या पाण्याचे तुरळक पाणी असल्याने शेतकऱ्यांकडून गाळ उपसा करण्यात येत आहे. 

मात्र मोठ्या प्रमाणात गाळ उपसा करण्याची गरज आहे. माहे जुन लागला असुन मान्सून दोनतीन दिवसांवर आहे. त्यापुर्वीच वादळी वारे सुटून अवकाळी वा रोहीण्याचे आगमान झालेले आहे. पाऊस डोक्यावर असल्याने शेतकरी ही पेरणीपूर्वी जमिनीची मेहनत कामाला लागला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.