Breaking Ticker

डॉ. के. पी. गारोळे एज्युकेशन सेंटर मध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार....


   प्रतिनिधी (तानाजी चंदे )

गंगाखेड येथील डॉ. के. पी. गारोळे एज्युकेशन सेंटर गंगाखेड येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडला.. या कार्यक्रमास गंगाखेड येथील सर्व डॉक्टर्स यांची उपस्थिती लाभली.. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गंगाखेड येथील सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टर व डॉ. के. पी. गारोळे एज्युकेशन सेंटर चे संचालक डॉ. श्री. किशन गारोळे साहेब हे होते.. तसेच या कार्यक्रमात मेडिकल असोसिएशन द्वारे घेण्यात आलेल्या निवडणुकीत विजयी होऊन कार्यकरणीवर निवड झालेले  श्री. नंदकुमार भरड आणि श्री.संदीप कोटलवार यांचा सत्कार करण्यात आला.. तसेच  दैनिक रोखठोक चे पत्रकार श्री. मकरंद चिनके यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार करण्यात आला..त्यानंतर डॉ. श्री. भगवान कांबळे यांनी लप्रोस्कोपी सर्जरी हॉस्पिटल सेवा गंगाखेड येथे नव्याने चालू केली त्याबद्दल त्यांचा देखील सत्कार करण्यात आला.

तसेच केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे माजी सदस्य श्री. प्रदीप गुंडाळे, डॉ. ज्ञानोबा तुरनर, डॉ. मुंजा रानगिरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला आणि शुभेच्छा देण्यात आल्या.. कार्यक्रमाच्या अध्यक्षक्षीय भाषणात श्री.. गारोळे सरांनी जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन च्या कार्यकारणीत निवडून आल्याबद्दल विजयी उमेदवारांचे कौतुक केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.. त्यांच्या भाषणातून आपण सर्वांनी एकी दाखवून आपले उमेदवार आपण आपल्या एकीने भरगोष मतांनी निवडून कसे आणले याबद्दल मार्गदर्शन केले.. तसेच या कार्यक्रमाला डॉ. के. पी. गारोळे एज्युकेशन सेंटर च्या संचालिका व प्राचार्या सौ. किरणताई गारोळे यांची देखील उपस्थिती लाभली.. तसेच या कार्यक्रमाला गंगाखेड शहरातील डॉ. मनिष बियाणी, डॉ. किशोर कुगणे, डॉ. फेरोज शेख, डॉ. अशोक हनवते, डॉ. तोष्णवाल, डॉ. ज्ञानोबा होलंबे, डॉ. मल्लूरवार, डॉ. रितेश वट्टमवार, डॉ. बाळासाहेब मानकर, डॉ. योगेश, डॉ. कलीम खान, डॉ. श्रीहरी टाले, डॉ. सोलंकर, इत्यादी सर्व डॉक्टर्स असोसिएशन चे डॉक्टर्स उपस्थित होते...कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री. तुकाराम हुरगुळे सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार डॉ. श्री. किशोर कुगणे यांनी मांडले.. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. के. पी. गारोळे एज्युकेशन सेंटर च्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी यांची उपस्थिती लाभली.a

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.