प्रतिनिधी - संतोष भालेराव
११ जून वाशिम : रिसोड तालुक्यातील गोवर्धन येथे शेती वाचवा अभियानांतर्गत १० जून रोजी गोवर्धन येथील रेणुका माता मंदिर सभागृहात उमेद अभियानांतर्गत गोवर्धन सर्कलच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास महिला बचत गटांच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र, वाशिम यांच्या वतीने नैसर्गिक शेतीचे महत्त्व, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन, मृदा आरोग्य संवर्धन व मानवी आरोग्य सुरक्षा या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कृषी विज्ञान केंद्र, वाशिमचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर. एल. काळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, माती ही शेती उत्पादनाची मूलभूत संपत्ती असून तिचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म जपणे अत्यंत आवश्यक आहे. रासायनिक निविष्ठांचा अतिरेकी वापर टाळून स्थानिक संसाधनांवर आधारित नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते, सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता सुधारते तसेच जमिनीची उत्पादनक्षमता दीर्घकालीन टिकून राहण्यास मदत होते. सुरक्षित, विषमुक्त व पोषणमूल्यांनी समृद्ध अन्न उत्पादनाद्वारे मानवी आरोग्य सुदृढ ठेवण्यास हातभार लागतो, असे त्यांनी नमूद केले.
कृषी विज्ञान केंद्राचे कृषी तज्ज्ञ शुभम पवार यांनी संतुलित खत व्यवस्थापन, अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर, मृदा परीक्षणाचे महत्त्व तसेच पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार खतांचा योग्य वापर याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी विद्राव्य खतांच्या वापराचे प्रात्यक्षिक सादर करून ठिबक सिंचन व फर्टिगेशनद्वारे अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढविणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमास तालुका अभियान व्यवस्थापक संतोष आघाव, तालुका व्यवस्थापक राजकुमार खानझोडे, प्रभाग समन्वयक निलेश सरनाईक तसेच राष्ट्रमाता महिला प्रभाग संघ, गोवर्धनच्या अध्यक्षा सौ. मंगला आढाव, सचिव कल्पना साळवे, कोषाध्यक्ष आशा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला बचत गट सदस्यांना नैसर्गिक शेती, मृदा संवर्धन व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी उपयुक्त माहिती मिळाल्याने समाधान व्यक्त
