Breaking Ticker

घरकुलासाठी वन विभागाची जागा मिळविण्यासाठी तातडीने हालचाल करा.

     

                           

सामाजीक कार्रयकरतेॅ इकबाल पटेल यांचे नगर परिषदेला निवेदन

मुनीर अब्बास शाह छ.संभाजीनगर प्रतीणीधी.                   

खुलताबाद शहरातील बेघर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी वन विभागाच्या ताब्यातील उपलब्ध जागा नगर परिषदेच्या ताब्यात घेण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते इकबाल पटेल यांनी नगर परिषद प्रशासनाकडे सोमवारी (ता.८) रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

पटेल यांनी दिलेल्या निवेदनानुसार, शहरातील अनेक पात्र लाभार्थी गेल्या अनेक वर्षांपासून घरकुल योजनेच्या प्रतीक्षेत असून जागेअभावी त्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. परिणामी शेकडो कुटुंबांना शासनाच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही.

मेहस्माळ रोडवरील डॉ. जाकीर हुसेन बी.एड. कॉलेजसमोरील वन विभागाच्या ताब्यातील काही जागा सध्या रिकामी व अनुपयोगी असल्याचे निदर्शनास येत असून, ती शहरापासून अवघ्या एका किलोमीटर अंतरावर असल्याने घरकुल प्रकल्पासाठी उपयुक्त ठरू शकते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यामुळे नगर परिषद प्रशासनाने संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून संयुक्त स्थळ पाहणी करावी तसेच आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून सुमारे १० एकर जागा नगर परिषदेला उपलब्ध करून घेण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच या जागेवर उभारण्यात येणाऱ्या घरकुल वसाहतीस "पूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम कॉलनी" असे नाव देण्याचीही विनंती इकबाल पटेल यांनी केली आहे.

बेघर नागरिकांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा जनहिताचा प्रश्न असून प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन घरकुल योजनेला गती द्यावी, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.