Breaking Ticker

वरवंड येथील युवकाने मिळवली वैद्यकीय क्षेत्रातील MBBS पदवी, वरवंड ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला सत्कार.


प्रतिनिधी : राहुल दिवेकर

वरवंड दि.१३ जून :- वरवंड कवठीचा मळा येथील शिवाजी विठ्ठल दिवेकर यांचे नातू व नेहा निलेश शिवाजी दिवेकर यांचे चिरंजीव डॉ. प्रणव निलेश दिवेकर यांनी नुकतीच वैद्यकीय क्षेत्रातील MBBS ही पदवी मेहनतीने प्राप्त केली.

वडिलांच्या अकाली जाण्यानंतर जी कौटुंबिक उणीव निर्माण झाली होती ती दूर ठेवत त्यातून मार्ग काढत असताना जिद्द,कष्ट व चिकाटीच्या मदतीने खडतर प्रवासाचा मार्ग व परिस्थितीची जाणीव ठेवून हे उद्दिष्ट त्यांनी साध्य केले असल्याने परिसरात त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे तसेच गावाचेही नावलौकीक झाले आहे.हे शिक्षण घेत असताना डॉक्टर प्रणव यांना त्यांचे आजोबा व आई नेहा तसेच त्यांच्या चुलत्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

शिक्षणाचा हा टप्पा पूर्ण करताना त्यांना बारावी पासूनच खरतरं खूप अडचणींचा सामना करना लागला परंतु खचून न जाता प्रणव यांनी NEET परिक्षा देऊन नाशिक येथील SMBT कॉलेजला MBBS साठी प्रवेश मिळवला व आपले शिक्षण पूर्ण केले तसेच इतर विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला. परिस्थितीवर मात कशी करावी याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांचा ग्रामपंचायत वरवंड व ग्रामस्थांच्या वतीने मा.आमदार रमेश आप्पा थोरात यांच्या हस्ते वरवंड ग्रामपंचायत येथे सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य प्रदीप भाऊ दिवेकर तसेच आजी-माजी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.