जिल्हा प्रतिनिधी सुनिल जाधव
*पत्रकार कुंदन जाधव यांच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर* कठोर कारवाईची मागणी
*गोरसेनेच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन प्रा संदेश चव्हाण गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष भारत*
IBN-18 लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी व पत्रकार कुंदन जाधव यांच्या दुर्दैवी आत्महत्येच्या घटनेने पत्रकारिता क्षेत्रासह संपूर्ण समाजाला मोठा धक्का बसला आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून, त्यांच्या आत्महत्येमागे कोणाचा दबाव, मानसिक त्रास, धमकी किंवा अन्य कारणे होती का, याची निष्पक्ष व सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
कुंदन जाधव यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या व्यक्ती अथवा व्यक्तींविरुद्ध चौकशीअंती दोष सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गोरसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
*या संदर्भात गोरसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. सदर प्रकरणाची कोणत्याही* प्रकारची राजकीय अथवा सामाजिक दबावाखाली चौकशी न होता सत्य समोर यावे आणि आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी त्याच्या पत्नी प्रियंकाताई जाधव यांनी केली
On Wed, Aug 12, 2026, 9:18 PM Sunil Jadhav <[email protected]> wrote:
*कारंजा येथील बंजारा समाज बांधवांची सहविचार सभा संपन्न-*
*आज कारंजा येथील महानायक वसंतरावजी नाईक सामाजीक सभागृह बंजारा काँलनी येथे बंजारा समाज बांधवांची सहविचार सभा कारंजा तांड्याचे नायक श्री भिकासिंगजी राठाेड याचे अध्यक्षते खाली कारभारी प्रा.मदन जाधव यांचे उपस्थितीत संपन्न झाली.*
*सहविचार सभेत यावेळी तिजाेत्सव कार्यक्रम साजरा करणे,तिजाेत्सव समिती स्थापन करणे,१८आँगष्ट २०२६ ला महानायक वसंतरावजी नाईक साहेब पुण्यतिथी साजरी करणे,गुणवंत विद्यार्थांचा व सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सपत्निक सत्कार करणे,२१आँगष्ट २०२६ माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक साहेब यांच्या जयंती निमित्त जलसंधारण दिन साजरा करणे अशा विविध कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे.*
*या सहविचार सभेला कारंजा शहरातील प्रत्येक काँलनीतील नायक,कारभारी,प्रतिष्ठीत नागरीक व बंजारा समाज बांधव माेठ्या संख्येंने उपस्थीत हाेते...

