Breaking Ticker

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी ८ सप्टेंबरला जनसंकल्प मेळावा

 








कोरपना प्रतिनिधी : (जगन्नाथ पिदुरकर)


स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला बळ देण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता आहरी येथील इंडियन पॅलेस फंक्शन हॉल, महागाव रोड येथे होणार आहे.

विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र राज्याची निर्मिती करणे, विदर्भातील महसुलावर विदर्भाचा अधिकार प्रस्थापित करणे, शेतकरी व बेरोजगारांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधणे, तसेच विदर्भातील अनुशेष दूर करण्यासाठी विविध मागण्या या मेळाव्यात मांडण्यात येणार आहेत.

‘नागपूर करार होळी आंदोलन’ तसेच २८ सप्टेंबर २०२६ रोजी ११ जिल्ह्यांत व १२० तालुक्यांत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

विदर्भातील शेतकरी, बेरोजगार, कामगार, विद्यार्थी तसेच नागरिकांच्या प्रश्नांसाठी संघटनेने विविध मागण्या पुढे केल्या आहेत. केंद्र सरकारने विदर्भाचे स्वतंत्र राज्य तात्काळ निर्माण करावे, अन्यायकारक जीएसटीचा फेरविचार करावा, तसेच विदर्भातील विकासासाठी आवश्यक निधी व अनुशेषाचा प्रश्न सोडवावा, अशा मागण्यांचा त्यात समावेश आहे.

या जनसंकल्प मेळाव्यास विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वतंत्र विदर्भाच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.