Breaking Ticker

कोल्हापुरात 'एमडी ड्रग्सचा' पर्दाफाश; 20 ग्रॅम अंमली पदार्थासह दोघांना अटक..



अंमली पदार्थ विक्रीविरोधात एलसीबीची मोठी कारवाई; दोन संशयितांना अटक, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : शहरातील जयंती नाला परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोन संशयितांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. सॅम्युअल दिपक पवार (वय २२) आणि आदित्य अनिल कस्तुरे (वय २४) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.पोलिसांनी त्यांच्याकडून २० ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.), दोन मोबाईल फोन तसेच होंडा अॅक्टिव्हा दुचाकी, असा सुमारे २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.नशामुक्त कोल्हापूर जिल्हा’ मोहिमेअंतर्गत एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. जयंती नाला परिसरात एम.डी. विक्रीसाठी आणली जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त केलेला अंमली पदार्थ नेमका कुठून आणण्यात आला आणि तो कोणाला विक्री करण्यात येणार होता, याचा पोलीस तपास सुरू आहे. या कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कारवाई अधिक तीव्र करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.