Breaking Ticker

जसखार ग्रामसुधारणा मंडळाच्या सेक्रेटरीपदी सुरज कडू यांची निवड



उरण : सुनिल ठाकूर 

जसखार ग्रामसुधारणा मंडळाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आमदार महेशशेठ बालदी यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे सुरज कडू यांची सेक्रेटरीपदी निवड झाली. सेक्रेटरीपदाच्या निवडणुकीत सुरज कडू यांनी ६९ मते मिळवत राकेश तांडेल यांचा पराभव केला. राकेश तांडेल यांना ५२ मते मिळाली.

सुरज कडू यांच्या विजयामागे स्थानिक पातळीवर विविध मान्यवर आणि पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्याची चर्चा जसखारमध्ये सुरू आहे. महालन विभागप्रमुख महेश कडू, उद्योगपती जितेंद्र घरत, उपनगराध्यक्ष रविशेठ भोईर, माजी सरपंच दामोदरशेठ घरत, युवा मोर्चा सरचिटणीस उरण विशाल तांडेल  तसेच भारतीय जनता पार्टी जसखार अध्यक्ष अक्षय घरत यांनी सुरज कडू यांच्या बाजूने भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे.

या स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे सुरज कडू यांना निवडणुकीत संघटनात्मक बळ मिळाले आणि त्यांचा विजय अधिक सोपा झाला, अशी चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. विशेषतः आमदार महेश बालदी यांच्याशी असलेली जवळीक आणि स्थानिक पातळीवरील या समर्थकांची साथ यामुळे सुरज कडू यांच्या उमेदवारीकडे निवडणुकीदरम्यान विशेष लक्ष लागले होते.

या निकालानंतर जसखारमधील सामाजिक आणि स्थानिक राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू झाली आहे. आगामी २०२७ च्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीतील निकाल आणि विविध गटांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.

नवनिर्वाचित सेक्रेटरी सुरज कडू यांनी ग्रामसुधारणा मंडळाच्या माध्यमातून गावातील सामाजिक, विकासात्मक आणि नागरी प्रश्नांसाठी काम करण्याची भूमिका घेतली असून, ग्रामस्थांनी दिलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

दरम्यान, सुरज कडू यांच्या विजयामुळे २०२७ च्या ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी जसखारमधील स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये कोणते बदल होतात, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.