सुमेध दामधर तालुका प्रतिनिधी
संग्रामपूर तालुक्यातील भोन येथे सम्राट अशोक विजयादशमी निमित्त २० ऑक्टोबर २०२६ रोजी आजाद समाज पार्टी व भोन बुद्धस्तुप संघर्ष कृती समिती द्वारा आयोजित भव्य अभिवादन सभा शांततेत व सफलतापूर्वक संपन्न झाली. या सभेला गांव खेड्यातूनव तालुका जिल्यातून समाज बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. अभिवादन सभेची सुरुवात उपस्थित मान्यवरांकडून बहुजन महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दिप धुपाने पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उदघाटन गोल्डनमॅन दिलीप खरात यांनी केले तर प्रास्ताविक आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्य सचिव सुजित बांगर यांनी केले. या प्रसंगी कुणाल पैठणकर, बाबुराव सरदार यांनी स्तूपाविषयी माहिती दिली. तसेच इतिहासकार डॉ.विलास खरात यांनी मार्गदर्शन करतांना स्तूपाविषयी माहिती देत असतांना ते म्हणाले कि ह्या ठिकाणी अनेक संघाराम आहेत बुद्ध इतिहासात संघाराम म्हणजे भिख्खूचे ध्यानाचे केंद्र होय. या संघाराम वरून संग्रामपूर अशी या तालुक्याची ओळख झाली आहे. या कार्यक्रमाचे संपूर्ण व्यवस्थापन भोन येथील बौद्ध अनुयायांनी केले होते तर कार्यक्रमासाठी स्वतःच्या शेतीतील उभे पीक काढून जागा उपलब्ध करून देणारे रामचंद्र अजने तसेच खीरदान करणारे शालिग्राम अंदुरकर व परिवार बोंडगाव यांनी दिले तर संग्रामपूर येथील संतोष गणेश तायडे यांनी शिरा दान दिला सोबतच टीम परिवर्तन ग्रुप संग्रामपूर यांनीही सहकार्य केले. तसेच भीम क्रांती नवयुवक मंडळ भोन बुद्ध स्तुपाचे यांनी अल्पपोहार दिला. या कार्यक्रमाला आशिष बाबा खरात, प्रकाश धुंदळे, विजय वानखडे, सागर मोरे, स्वप्नील मोरे, पंकज शेगोकार, गौरव झिने, आशिष धुंदळे, श्रीकृष्ण इंगळे,स्नेहलताई वानखडे,बाबुलाल इंगळे,कैलास दाभाडे राजूभाऊ पाचपोर, किशोर भिडे,राहुल नितोने, विलास दामोदर संदेश वानखडे यांच्यासह समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. तर या भव्य अभिवादन सभेचे सूत्रसंचालन व आभार विजय इंगळे यांनी केले.
