Breaking Ticker

कर्जमाफीसाठी ऑल इंडिया पँथर सेना आक्रमक; सक्तीची वसुली थांबविण्याची मागणी.



सुमेध दामधर तालुका प्रतिनिधी 

संग्रामपूर  दुष्काळसदृश परिस्थिती, बेरोजगारी व वाढत्या महागाईमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतमजूर, भूमिहीन कुटुंबे आणि महिला बचत गटांना कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयभाई वानखडे यांनी केली आहे. यासंदर्भात दि. २१ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री यांना तहसीलदार, संग्रामपूर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. 

मायक्रोफायनान्स कंपन्या, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व उमेद अभियानांतर्गत घेतलेल्या कर्जांची संपूर्ण माफी करावी आणि कर्जमाफीचा निर्णय होईपर्यंत सक्तीची वसुली स्थगित करावी, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. कर्जवसुलीदरम्यान महिलांना धमकावणे, अपमानित करणे किंवा मानसिक त्रास देण्याच्या प्रकारांना आळा घालावा, तसेच कर्जबाधित कुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यांना आर्थिक मदत व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली. शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा; अन्यथा वंचित व कर्जबाधित जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विजयभाई वानखडे यांनी दिला. यावेळी तालुक्यातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या मागण्यांकडेही शासनाचे लक्ष वेधण्यात आले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.