माणूस जगातून निघून जातो मात्र त्याच्या आठवणी कायम जिवंत राहतात.याच भावनेतून पडेगाव येथील कै.विश्वनाथ बापूराव निरस यांच्या अस्थींचे पारंपरिक पद्धतीने नदीपात्रात विसर्जन न करता स्वतःच्या शेतात विसर्जन करून त्याच ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.(दिनांक १९ ऑक्टोबर) सोमवार रोजी कै.विश्वनाथ बापूराव निरस यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी प्रा.कारभारी निरस,डॉ.कालिदास निरस,प्रा. वसंत निरस,शिवाजी निरस यां भावंडांनी हा पर्यावरणपूरक आणि भावनिक निर्णय घेतला.या उपक्रमातून पित्याविषयीची कृतज्ञता,निसर्गाविषयीची आत्मीयता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजासमोर ठेवण्यात आला.यावेळी पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर,गंगाखेड कृ.ऊ.बा.समिती सभापती साहेबराव भोसले,माजी सभापती बालासाहेब निरस यांच्यासह नातेवाईक,ग्रामस्थ व कुटुंबीय उपस्थित होते.
पित्याच्या अस्थींना नदीमध्ये विसर्जन न करता वृक्षारोपण करून निरस परिवाराने जपल्या स्मृती
0
October 23, 2026
Tags
