Breaking Ticker

वेरूळलेणी येथून बायपास रस्ता कामाला वेग, लेणी व घृष्णेश्वर मंदिरसाठी सतत भाविक पर्यटकांची प्रचंड गर्दी

 


मुनीर शाह छ.संभाजीनगर रिपोर्टर 

खुलताबाद : ऐतिहासिक व जगप्रसिद्ध वेरूळ येथील लेणी पासून घृष्णेश्वर मंदिर परिसरात जाणारा बाय पास रस्ता कामाला आता वेग आला आहे. ऐतिहासिक व जगप्रसिद्ध वेरूळ लेणी व बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर साठी देश व परदेशातील भाविक भक्त व पर्यटकांचा मंगळवार वगळता येथे प्रचंड गर्दी चे चित्र असतात. बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर साठी मंदिर व परिसरात कोटीचे विकास कामे सुरू आहे. पुलकामे, रस्ते, भुयार रस्ते, नदी, सुशोभीकरण सह विविध कामे सद्या जोरात सुरू आहे. सार्वजनीक बांधकाम विभाग उप अभियंता दिलिप कोलते यांच्या देखरेख मार्गदर्शनाखाली विकास कामे सुरू आहे.

वेळोवेळी येथे जिल्हाधिकारी सह प्रशासकीय अधिकारी ही कामाची पाहणी सूचना करत असतात. त्यात स्थानिकांन कडून संथ गतीने काम होत असल्याचे आरोप ठेकेदार वर सुरुआहे. भुयार रस्ता काम जलद गतीने तातडीने करावे असी इच्छा व मागणी असताना ठेकेदार चालढकल करत असल्याचे आरोप होत आहे. भाविक पर्यटक व नागरिकांना वेरुळ भोसले चौक येथून ठिकठिकाणी पोलिस पॉईंट थांबा व इतर जडवाहने बसेस बंद करण्यात आल्याने नागरिकांतून नाराजी व असंतोष पसरला आहे. व पुन्हा भुयार मार्ग रस्ता काम संथ गतीने सुरू आहे. याकडेप्रशासनाने लक्ष घालून तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी आहे. नाशिक येथे जून मधे वर्ष - २०२७ मधे कुंभमेळा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वेरुळ येथे विकास कामे तातडीने व्हावे म्हणून प्रशासनाने कंबर कसली परंतु कामात चालढकल मुळे स्थानिक भाविक भक्त पर्यटक मधे नाराजी आहे. त्यात वेरूळ खुलताबाद घाट वेरुळ लेणी येथून बाय पास रस्ता कामाला वेग घेतल्याचे चित्र आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.