Breaking Ticker

बाजार सावगी येथे वन्यजीव सप्ताह निमित्त जनजागृती



 वन्यजीव संवर्धनाचा संदेश.....

मुनीर शाह-छ.संभाजीनगर रिपोर्टर 

  बाजारसावंगी येथे वन विभाग आणि MANWITHINDIES FOUNDATION यांच्या संयुक्त विद्यमाने विविध जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, नागरिक तसेच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी मानद वन्यजीव रक्षक आर्किटेक्ट आशिप जोशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वन्यजीवांचे पर्यावरणातील महत्त्व, त्यांच्या अधिवासाचे संरक्षण आणि मानव-वन्यजीव सहअस्तित्वाची गरज यावाचत मार्गदर्शन केले. जंगल, गवताळ प्रदेश, जलस्रोत आणि इतर नैसर्गिक अधिवास सुरक्षित राहिले तरच वन्यजीवांचे अस्तित्व टिकून राहणार असून, त्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. वन्यजीव सप्ताह हा केवळ वन्यजीवांविषयी माहिती देण्यापुरता मर्यादित न राहता निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याची आणि संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची संधी आहे.

 असा संदेश यावेळी देण्यात आला. वन्यजीव आढळल्यास त्यांना त्रास न देता वन विभागाशी संपर्क साधणे, अधिवासाचे नुकसान टाळणे आणि स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण करणे, असे आवाहनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव व पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासोबतच 'वन्यजीव वाचवा, अधिवास वाचवा' हा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी निखिल देशमुख, वनपाल शिंदे वनरक्षक आर. व्ही. पवार, व्ही ए गायकवाड.पी. वी. काकरवाल यांच्यासह वन विभागाच्या संपूर्ण कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती. तसेच वन्यजीव बचावकर्ते जय देसाई आणि हर्ष केवरे यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला. वन विभाग आणि MANWITHINDIES FOUNDATION यांच्या संयुक्त प्रयत्नातून विद्यार्थ्यांना वन्यजीव संवर्धनाचावत प्रत्यक्ष माहिती व मार्गदर्शन मिळाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.