मुनीर शाह छ.संभाजीनगर रिपोर्टर
खुलताबाद : तालुका दुष्काळी सदृश्य परिस्थिती तथा दुष्काळ...जाहीर झाल्यानंतर ही ग्रामीण भागात मात्र 'मायक्रो फायनान्स ' चे महिला व पुरुष बचत गट कडून वसुली केल्या जात असल्याचे चित्र आहे. पावसाअभावी खुलताबाद तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती बघता दुष्काळ जाहीर करण्यात आले असुण पैसेआणावरी ४६ जाहीर करण्यात आली आहे. यंदा गत वर्षाच्या तुलनेत सरासरीच्या अर्धा ही पाऊस पर्जन्यमान झाला नाही. व परतीचा पाऊस व अवकाळीने ही तालुक्यात पाठ केली. त्यामुळे नदी नाले ओढे तलाव धरण कोरडी ठाक पडून आहे तर पावसाअभावी हाती तोंडी आलेली खरिप पिके वाया गेली. महागडी बी बियाणे खते औषधी मजुरी मरमर मेहनत कष्ट करून शेतकऱ्यांच्या हाती काहीच आले नाही.
पाण्यासाठीची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. सद्या बागायतदार शेतकऱ्यांची ऊस व इतर फळबाग वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. प्रशासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर बैंक व इतर आर्थिक पुरवठा करणाऱ्या संस्थांना दिलेल्या कर्जाची वसुली करु नये तगादा लावू नये पाठपुरावा करु नये असी सूचना दिल्या परंतु ग्रामीण भागात मात्र "मायक्रो फायनान्स" महिला पुरुष बचत गटांना दिलेल्या कर्जाची वसुली करताना दिसून येत आहे. तर काही बचतगट कर्ज दारांनी महिला पुरुषांनी या संदर्भात वसुली प्रतिनिधी ला सचेत केले
परंतु आम्हाला जीआर अधिसूचना मिळाली नाही चा दुजारा देत हप्ता कर्ज वसुली केली असल्याचे गटाच्या महिला पुरुष सदस्यांनी सांगितले. मा. जिल्हाधिकारी व मा. तहसीलदार यांनी ग्रामीण भागात लक्ष देवून हा प्रकार थांबवावा. नसता ऐन दुष्काळात काही अनुचित प्रकार घडल्यास आपण जवाबदार रहाल असे नागरिकांचे म्हणे आहे. कारण तालुक्यात गावा गावात महिला पुरुष बचतगटाच्या माध्यमातून कर्ज वाटप व वसुली प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु होती. मात्र दुष्काळ असताना हा गलिच्छ प्रकार सुरुच आहे.
