तानाजी चंदे ( प्रतिनिधी - गंगाखेड )
दिव्या डिगुळेची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी निवड
शालेय क्रीडा क्षेत्रात आपल्या यशाची परंपरा कायम राखत रुद्राक्ष जिम्नॅस्टिक क्लासेस,गंगाखेडने सलग चौथ्या वर्षी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.शालेय विभागीय जिम्नॅस्टिक क्रीडा स्पर्धेत रिदमिक जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारात १९ वर्षांखालील मुलींच्या गटात जिल्हा परिषद हायस्कूल,गंगाखेड येथील विद्यार्थिनी कु.दिव्या भरत डिगुळे हिने उत्कृष्ट कामगिरी करत नागपूर येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे.तिच्या या यशामुळे गंगाखेडच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.छत्रपती संभाजीनगर येथे (दिनांक २४ ऑक्टोबर शनिवार) रोजी शालेय विभागीय जिम्नॅस्टिक क्रीडा स्पर्धा पार पडली रिदमिक जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारात १९ वर्षांखालील मुलींच्या गटात जिल्हा परिषद हायस्कूल,गंगाखेड येथील विद्यार्थिनी कु.दिव्या भरत डिगुळे हिने उत्कृष्ट कामगिरी करत नागपूर येथे होणाऱ्या अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपले स्थान पक्के केले.
दिव्या डिगुळे हिस रुद्राक्ष जिम्नॅस्टिक क्लासेस,गंगाखेडचे संस्थापक-संचालक तथा क्रीडा मार्गदर्शक धनराज मुंडे यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्याने सातत्यपूर्ण सराव,मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले.राज्यस्तरावर निवड होणे ही दिव्याच्या क्रीडा प्रवासातील महत्त्वपूर्ण कामगिरी असून,तिच्या यशामुळे गंगाखेडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.रुद्राक्ष जिम्नॅस्टिक क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जिम्नॅस्टिकचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील क्रीडागुणांना वाव देण्याचे कार्य केले जात आहे.सलग चौथ्या वर्षी मिळालेल्या यशामुळे या प्रशिक्षण केंद्राची यशस्वी वाटचाल पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
या यशाबद्दल आ.डॉ.रत्नाकरराव गुट्टे,जिल्हा परिषद सभापती प्रतिनीधी लक्ष्मण मुंडे,सभापती मनोज मुंडे,जिल्हा क्रीडा अधिकारी कल्याण पोले,तालुका क्रीडा अधिकारी सुयश नाटकर,तालुका क्रीडा अधिकारी रोहन औंढेकर,तालुका क्रीडा अधिकारी साळवे,गटशिक्षणाधिकारी रोहिणी पवार,मूख्याध्यापक शशिकांत मुंडे,मुख्याध्यापक चंद्रकांत फड,राष्ट्रीय पंच संदीप लटपटे,प्रदीप लटपटे,तालुका क्रीडा संयोजक विलास राठोड,क्रीडाप्रेमी माणिक नागरगोजे,महादेव लातूरे,क्रीडाशिक्षक जयदीप फड,निवृत्ती भेंडेकर,रवींद्र जाधव,ओमकार गुट्टे,रामेश्वर लटपटे,भागवत पोले यांच्यासह शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून दिव्या डिगुळे आणि तिचे मार्गदर्शक धनराज मुंडे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
