पाण्याची समस्या उदभवण्या पुर्वी प्रशासनाने तातडीने सतर्कता दाखवावी...
मुनीर शाह छ.संभाजीनगर रिपोर्टर
तालुक्यातील येस गाव येथील गिरीजा मध्यम प्रकल्प, गंधेश्वर येथील गंधेश्वर धरण, लोणी येथील लोणी धरण, सोबलगाव दरेगाव येथील तलाव वातील पाणी साठा झपाट्यानेकमी होत असुण पुढे सात आठ महिने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नियोजन होने आवश्यक असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्या नसता नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येवू शकते यालागंभीरतेने घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
तालुक्यातील प्रकल्प धरण तलाव यातील उपलब्ध पाणी साठा आज काही उद्या काही असे चित्र दिसून येत आहे. झपाट्याने पाणी साठा कमी होत असल्याचे चित्र आहे. यंदा पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवली नदी नाले ओढे पाणी पूर अभावी कोरडेच पडून आहे. पावसाळ्यात सलग तीनचार दिवस संततधार पाऊस सुरू होता तेव्हा एकदा नाममात्र पूर पाणी येवून गेले तेही धरण तलाब पर्यंत पोहचले नाही. काही ठिकाणी पोहचले त्याचा
पाणी साठा व जुना पाणी साठा मिळून पाणी साठा प्रकल्प धरण तलाव मधे उपलब्ध होते परंतु सप्टेंबर / ऑक्टोबर मधे तीव्र कडक उन्ह (हिट) वारा व बाष्पीभवन व उपसा बघता झपाट्याने पाणी साठा कमी होत आहे. जर असेच सुरू राहील्यास पाणी टंचाई प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यास प्रशासनाने तातडीने व सक्तीने निपटण्याची गरज आहे. नसता नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकंती करण्यास वेळ लागणार नाही. याची गंभीरतेने दखल घ्यावी असी मागणी नागरिकांतून होत आहे.
