जळकोट प्रतिनिधी, कमलाकर वाघमारे
दिनांक 10 ऑक्टोबर 2026 रोजी जळकोट तालुक्यातील बेळसांगवी येथे शेताच्या बांधावर जाऊन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीदुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा.लातूर जिल्ह्यातील उदगीर आणि जळकोट तालुक्यांमध्ये पावसातील खंडामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शनिवारी, 10 ऑक्टोबर रोजी जळकोट तालुक्यातील बेळसांगवी येथे भेट देऊन शेतपिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेताच्या बांधावर जाऊन पिकांची स्थिती जाणून घेण्यात आली.
यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण आणि पावसातील खंड यामुळे शेतीसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. जळकोट तालुक्यातील बेळसांगवी परिसरात पालकमंत्र्यांनी तूर आणि सोयाबीन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पावसाच्या अनियमिततेचा पिकांच्या वाढीवर होणारा परिणाम आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणी यांचा आढावा यावेळी घेण्यात आला
उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केली. पिकांचे प्रत्यक्ष नुकसान लक्षात घेऊन बाधित क्षेत्राचे वस्तुनिष्ठ पंचनामे करणे आणि पात्र शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे महत्त्वाचे असल्याचे या पार्श्वभूमीवर अधोरेखित झाले.
पावसाअभावी किंवा पावसातील दीर्घ खंडामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची अचूक नोंद होणे, पीक विम्याच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत आणि शासनाच्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना मदत मिळावी, या बाबींना महत्त्व आहे. त्यामुळे प्रशासनाने पीक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेपावसाअभावी किंवा पावसातील दीर्घ खंडामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची अचूक नोंद होणे, पीक विम्याच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत आणि शासनाच्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना मदत मिळावी, या बाबींना महत्त्व आहे. त्यामुळे प्रशासनाने पीक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
