12 व्या पुण्यस्मरणानिमित्त समाधीस्थळी हजारोंचा जनसागर वडिलांची शिकवण आणि त्यांनी दाखवलेला सेवेचा मार्ग सदैव माझ्या पाठीशी - आ.डॉ. तुषार राठोड
*नांदेड प्रतिनिधी मारोती वडजे*
मुखेड लोकनेते तथा मुखेड कंधार मतदार संघाचे स्व. आमदार गोविंदराव राठोड यांच्या १२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त हजारो नागरिकांनी त्यांना भावपूर्ण अभिवादन केले. यावेळी त्यांच्या समाधीचे माजी नगराध्यक्षा श्रीमती चक्रावतीबाई गोविंदराव राठोड, आ.डॉ. तुषार राठोड व माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड यांच्यासह संपूर्ण राठोड कुटुंबाने पूजन करून अभिवादन केले.
लोकनेते स्व. आ. गोविंदराव राठोड यांनी समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिकविकासासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. मुखेड सारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरीब विद्यार्थी शिकला पाहिजे शिक्षण शिकवतो मोठा झाला पाहिजे अधिकारी झाला पाहिजे ही तळमळ त्यांच्यामध्ये नेहमी होती. आयुष्यभर त्यांनी समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय कसा भेटेल यासाठी प्रयत्न केले. जनसामान्यांची नाळ हेच त्यांना लोकनेते म्हणून पुढे समोर आणली आणि आमदारही केले. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते आणि शपथविधी
समारंभाला जाताना त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या 12 व्या पुण्यस्मरणानिमित्त हजारोंच्या संख्येने अनेक मान्यवरांनी नागरिकांनी, महिलांनी भाजप पदाधिकारी व सर्व पक्षातील नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावून त्यांना अभिवादन केले,
आपल्या भागातील प्रत्येक व्यक्ती शिक्षित व्हावी, समाजाचा आर्थिक, शैक्षणिक आणि आत्मिक विकास व्हावा, सामान्य माणसाच्या जीवनात प्रगतीची नवी पहाट यावी, हे त्यांचे स्वप्न होते. समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी पाहिलेल्या या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवणे, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे आणि जनसेवेचे व्रत अखंड सुरू ठेवणे, हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल. वडिलांची शिकवण आणि त्यांनी दाखवलेला सेवेचा
मार्ग सदैव माझ्या पाठीशी आहे. त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत राहणे, हीच त्यांच्याप्रती माझी कृतज्ञता आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा माझा संकल्प आहे.- आ. डॉ. तुषार राठोडमुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघ तथा अध्यक्ष, दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. नांदेड
