पाणीटंचाईग्रस्त गावांना तातडीने पाणीपुरवठा करण्याची अखिल भारतीय छावा संघटनेची मागणी*
*नांदेड प्रतिनिधी मारोती पाटील वडजे*
मुखेड तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांची चौकशी करून पाणीटंचाईग्रस्त गावांना तातडीने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील शिंदे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत शासनाचा मोठ्या प्रमाणात निधी खर्च होऊनही अनेक गावांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कामांची गुणवत्ता, पूर्णत्व आणि प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याची स्थिती तपासून अपूर्ण व निकृष्ट कामांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
