Breaking Ticker

आमचंच पोट भरना,जनावरांचं कराव काय?


कवडीमोल दराने जनावरांची विक्री, मदतीची अजूनही प्रतीक्षा 

नळेगाव (हेमंत पतंगे )

दि: मायबाप! आमचं पोट कसं भरायचं कळना, तर मुक्या प्राण्यांना काय खाऊ घालायचं? चारापाणी नसल्याने जनावरांची खपाटी बसली आहेत. विकतचा चारा घालणे शक्य नाही. यामुळे कवडीमोल भावात जनावर विकण्याची वेळ आली आहे.

नळेगावातील बाजारात जनावरे विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांनी मांडलेली ही व्यथा परिसरातील दुष्काळाची आणलेल्या शेतकऱ्यांनी मांडलेली ही व्यथा परिसरातील दुष्काळाची तीव्रता सांगतात. गेल्या काही वर्षपासून निसर्गाच्या लहरी पणामुळे शेती आर्थिक संकटात सापडली आहे.दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होतं चाले आहे. पाणी पातळी खालावत चालली आहे. नळेगाव व परिसरातील बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह शेतीवरच आहे. गेल्या चार वर्षातील निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी कोलमदले असून यंदा आगामी काळातील भविष्याची चिंता भेडसावत आहे. यावर्षी शिवारात पाणी, चारा नाही. अशी अवस्था असताना प्रशासनाकडून कोणत्याही उपाय योजना केल्या जात नाहीत. यंदा शेतात पेरले तेवढे सुद्धा निघाले नसल्याने उधार उसणवारी फेडण्यासाठी दावणीची जनावरे कवडीमोल भावाने विकावी लागत आहेत.

नळेगाव महसूल मंडळात यंदा पावसाचा जिल्ह्यात निचानक झाला असून 337 मिली मिटर नोंद झाली आहे. अपुऱ्या पावसामुळे खरीपात मूग व उडदाची रास मिळाली नाही. सोयाबीन शेतातच वाळून गेले आहे. पाऊस न पडल्याने उसाची वाढ झाली नाही. तो धड गुरंचा चाराही नाही व धड गाळपाच्या शकमता नाही. खुद्द मुख्यमंत्त्रानी दुष्काळाची पाहणी केली. मात्र अद्याप ठरल्याचे शेतकऱयांना वाटते. 1972 पेक्षा दुष्काळ महा भयंकर होणार याची चर्चा गावकुसात वाढली आहे.

यावर्षीच्या अल्प पावसाने खरीप हंगाम अपेक्षित उत्पादन निघाले नाही. रब्बीची पेरणी झालीच नाही. यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकरी शेतीला जोड धंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात. मात्र चाराच नसल्याने दुभती जनावर ठेवणे अवघड झाले आहे. विकतचा चारा परवडत नाही. परिसरातील सर्वच जलस्रोत कोरडे पडले आहेत. शिवारात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न आहे. सध्या दुष्काळाची तीव्रता वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे जनावरांचा बाजार फुलत आहे. नळेगावच्या आठवडे बाजारात मराठवाड्यासह कर्नाटक, आंध्रतून व्यापारी जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी येतात. येथील बाजार प्रत्येक आठवड्यात बहरतच चालला आहे. विक्रीसाठी मोठ्या संख्येने जनावरे येत आहेत. शेतकऱ्यांना मात्र कवडीमोल भावाने जनावरे विकावी लागत आहेत. जनावरे विकायची नाहीत, तर त्यांना खाऊ काय घालायचे ही त्यांची व्यथा आहे.


यंदाच्या दुष्काळामुळे जगणे अवघड असून ज्यांची शेतीवरच उपजीविका आहे त्या शेतकऱ्यांची कूचबना होणार आहे. उत्पन्नाचे स्तोत्र संपल्याने शेतकरी हतबल असून दुष्काळामुळे कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे. निसर्गाच्या कोपामुळे शेतकऱ्यांची पत संपली आहे. बैल विक्रीसाठी काढले आहेत. कमी किंमतीत मागत आहेत. बाजारात दिवसेंदिवस जनावरांची आवक वाढत असली तरी खरेदी विक्रीचे प्रमाण मात्र कमी झाले आहे.-दयानंद मानखेडे शेतकरी नळेगाव

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.