Breaking Ticker

केरळ राज्यस्तरीय बातमी लेखन स्पर्धेत श्रेया पाटील हिचा द्वितीय क्रमांक



 सामाजिक कार्यकर्ते अविनाश पवार व मित्रपरिवाराकडून सत्कार

कोल्हापुर जिल्हा प्रतिनिधी.वैभव हराळे

कोल्हापुर ( पेठवडगाव ) येथील कर्णबधिर विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या कु. श्रेया धनाजी पाटील हिने केरळ राज्यात आयोजित बातमी लेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.श्रेया हिने आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवले आहे. तिच्या या कामगिरीमुळे कर्णबधिर विद्यार्थ्यांमधील कलागुण, सर्जनशीलता आणि क्षमता अधोरेखित झाली आहे. 

विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांनाही योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करू शकतात, याचे श्रेयाचे यश हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. श्रेया पाटील हिच्या यशाचे कौतुक करत सामाजिक कार्यकर्ते अविनाश पवार व मित्रपरिवाराने तिचा सत्कार केला. तिच्या या यशामुळे विद्यालयासह परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही तिने अशीच यशाची शिखरे गाठावीत, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.