शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन उत्साहात संपन्
सुमेध दामधर तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
सोनाळा येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, सोनाजी नगर येथे शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शाळेच्या प्रांगणात शाळा व्यवस्थापन समितीच्या पुनर्गठनासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बादलसिंग सोळंके तर उपाध्यक्ष पदी पूनम वानखडे यांची अविरोध निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सुमेध भाऊ दामधर होते. वरिष्ठ शिक्षक भगवान बावणे सर यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य समजावून सांगितले. यावेळी गावातील ज्येष्ठ मंडळी, महिला मंडळ, पालकवर्ग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाही पद्धतीने, नियमानुसार व पारदर्शक वातावरणात पालकवर्गातून सात महिला व दोन पुरुष अशा एकूण नऊ सदस्यांची निवड करण्यात आली.
सर्वानुमते नवीन समितीचे गठन करण्यात आले. यामध्ये शिक्षणतज्ज्ञ म्हणून माजी अध्यक्ष सुमेध भाऊ दामधर यांची निवड करण्यात आली. समितीच्या सचिवपदी शाळेचे मुख्याध्यापक गणेश जामनेकर सर कायम राहिले, तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून गजानन बावणे सर यांची निवड करण्यात आली. तर ग्रामपंचायत प्रतिनिधी पद बाकी राहिले. शारदा राजेश उंडे, अर्चना रामेश्वर सुरडकर, संगीता अजबराव बावने, निशा नरेंद्र इंगळे, ललिता प्रकाश गायकवाड व स्वाती विठ्ठल कांगोकार यांची सर्वानुमते सदस्य म्हणून निवड करण्यात आली. नवीन समितीच्या माध्यमातून शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे, शाळेतील भौतिक सुविधा सुधारणे तसेच शिक्षक व पालक यांच्यात समन्वय राखून शाळेच्या प्रगतीला चालना देणे, यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे, शाळा व्यवस्थापन समितीच्या पुनर्गठनाचा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, नियमानुसार व पारदर्शक पद्धतीने आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवर, पालक व ग्रामस्थांना चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. यावेळी सह. शिक्षक गजानन बावणे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रमाचा समारोप झाल्याचे जाहीर करण्यात आले.
