Breaking Ticker

दिवाळीचा आनंद पालावरील बांधवांसोबत साजरा



देगलूर प्रतिनिध मारोती पाटील वडजे 

 दीपावलीनिमित्त पालावर जाऊन तेथील माता-भगिनी आणि लहानग्यांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला. यावेळी माता-भगिनींना साडी वाटप, तसेच लहान मुलांना खाऊ व फराळाचे वाटप करण्यात आले.विशेष म्हणजे, पाल परिसरातील अनेक पालीवर  अंधाराचे वातावरण होते. ही बाब लक्षात घेऊन परिसरातील प्रत्येक पालावर वीजसुविधा उपलब्ध करून देत तेथील नागरिकांचे जीवन प्रकाशमय करण्याचा प्रयत्न केला.दिवाळी केवळ दिव्यांचा सण नसून, प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचा आणि प्रकाशाचा किरण पोहोचवण्याचा सण आहे. याच भावनेतून सर्वांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.

यावेळी समस्त बंधू-भगिनी  तसेच भाजपा विधानसभा अध्यक्ष श्री शंकरराव कंतेवार,भाजपा मंडळ अध्यक्ष श्री प्रशांत दासरवार,जिल्हा उपाध्यक्ष श्री अशोक साखरे,मंडळ सरचिटणीस श्री दिपक संगमकर,श्री प्रशांत पा.भोकसखेडकर,श्री योगेश पाटील नागराळकर,सहशिक्षक श्री नागलगावकर सर,श्री सचिन कांबळे यांच्यासह सहकारी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.